निवडणुकीच्या रिंगणात काळी माया !
राज्यातील विधानससभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून अनेकांनी सत्तासंघर्षात स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. पैशांचा व्यवहार कऊन, एकमेकांची माणसे विकत घेतली जात आहेत. तर बॅगा भऊन वाटलेल्या पैशांत मते घेतली जात आहेत. अर्थातच विधानसभेच्या या महासंग्रामात पक्ष आणि उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर आहेतच. मात्र त्यांच्याबरोबर काळी माया देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामाचे वारे शांत झाले. तोच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा सत्तासंघर्ष सुऊ झाला आहे. निवडणुकीच्या उमेदवारीवऊन अनेक पक्षात आणि नेत्यांमध्ये नाराजीसत्र असल्याने अनेक मतदारसंघात बंडखोरीला ऊत आला आहे. अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. तर दुसरीकडे नाराजांची मनधरणी सुऊ झाली. अशातच अर्ज भरल्यानंतर अनेक पक्ष आणि उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुऊवात केली आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचे दोन गट तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशी निवडणूक आहे. त्यात भाजप बरोबर शिंदेची शिवसेना तसेच अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. तर शरद पवार यांच्या साथीला उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील या निवडणुकीत जोर धरला आहे. यावेळेस मनसेच्या पदरात जास्त नाही तर कमीत कमी तीन जागा तरी येऊ शकतील असा अंदाज आहे. तसेच या निवडणुकीत सर्व पक्षांना आणि उमेदवारांना हवीहवीशी वाटणारी एक बाब रिंगणात उतरली आहे. ती म्हणजे काळी माया. या काळ्या मायेच्या जोरावरच सर्व पक्ष आणि उमेदवारांनी त्यांचे नशिब आजमाविण्यास सुऊवात केली आहे.
काळ्या पैशाच्या जोरावर मतदारांना विकत घेण्याचे प्रकार सुऊ झालेत. त्यासाठी सर्रासपणे राज्याच्या प्रत्येक रस्त्यावऊन काळ्या पैशाची वाहतुक सुऊ झाली. मात्र या काळ्या पैशाला अटकाव करण्यासाठी राज्य पोलीस आणि निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. याला देखील न घाबरता या उमेदवारांनी काळा पैसा मतदारापर्यंत पोहचविण्यासाठी आटापिटा करण्यास सुऊवात केली. कारण त्यांना माहीत आहे जर आता शांत बसलो तर पाच वर्षे विजनवासात काढावी लागतील. यामुळे साम-दाम-दंड भेद या नितीचा वापर करीत हालचाली केल्या तर पाचही बोटे पुढील पाच वर्षात तुपात असतील. अशी धारणा झालेल्या धुरिंधर राजकारण्यांनी काळ्या मायेचा वापर करण्यास सर्रासपणे सुऊवात केली आहे. गेल्या पाच वर्षात अवैध मार्गाने जी काळी माया कमविली आहे, त्यातील थोडी जरी आता बाहेर काढून वाटली, तरी यापेक्षा जास्त निवडून आल्यानंतर कमविता येईल, असा विचार या धूर्त राजकारण्यांनी केला आहे. त्यानुसार, ज्या ठिकाणी ही काळी माया पोहचवायची त्या ठिकाणी पोहचविण्यास देखील सुऊवात झाली. अशावेळी काही अधिकाऱ्यांचे देखील हात ओले करण्यास सुऊवात झाली आहे.
सध्या राज्यातील सर्वच मतदारसंघात अक्षरश: पैशांचा पाऊस पडण्यास सुऊवात झाली. अर्ज भरणे आणि उमेदवारी घोषीत होणे ही प्रक्रीया सुऊ असतानाच पोलीस आणि निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातून जवळपास 100 कोटीं ऊपयांची काळी माया जप्त केली. एवढेच नाही तर विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात पुणे पोलिसांनी 138 कोटींचे सोने जप्त केले. पुणे शहरात निवडणुकीच्या धामधुमीत न भूतो न भविष्यती एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने जप्त झाल्याने, सर्वांच्या भुवया उंचाविल्या आहेत. तसेच मुंबई-बेंगळूऊ महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यानजिक 5 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. तर Eिहगोलीतून 1 कोटींची रोकड ताब्यात घेण्यात आली. मुंबईतदेखील भुलेश्वर येथून 1 कोटींची रोकड जप्त केली. तर चेंबूर येथून 20 लाख ऊपये जप्त केलेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात काळी माया जप्त करण्याचा धडाका पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने सुऊ केला. मात्र याला देखील न जुमानता उमेदवारांनी काळी माया बाहेर काढण्याचे दुसरे मार्ग अवलंबविण्यास सुऊवात केली. एकदा का अर्ज मागे घेण्याची मुदत संपली रे संपली की मोठ्या प्रमाणात प्रचाराला वेग येईल. केवळ प्रचारालाच नाही तर काळ्s पैसे वाटपालादेखील वेग येईल.
पैशाच्या जीवावर माणूस काहीही कऊ शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो. याचे मूर्तीमंत उदाहरण या निवडणुकीत आढळून येईल. त्यातच जिकडे गुलाल तिकडे चांगभले! अशी या राजकीय नेत्यांची विचारसरणी या निवडणुकीत आढळून येत आहे. पैसा बोले, जैसा चाले! यानुसार या राजकीय नेते आणि पक्षांचे सुऊ आहे. तर जिल्हापातळीवर पैशांची सेटलमेंट कऊनच राजकीय सेटलमेंट करण्याचे डावपेच सुऊ आहेत. तर संवेदनशील म्हणविणाऱ्या मुंबईतदेखील तीच तऱ्हा आहे. गेल्या आठ दिवसांच्या आत अनेक ठिकाणी नाकाबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात काळी माया आढळून आली. मात्र प्रत्येकवेळी ही काळी माया निवडणुकीसाठी आली नसून, ती खासगी मालकीची असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. जर खासगी मालकीची ही काळी माया आहे, तर ऐनवेळी ती बाहेर का काढण्यात आली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 50 हजारापर्यंतची रोकड जवळ आढळली तर चौकशीला सामोरे जावे लागत नाही. मात्र त्यापेक्षा जास्त रक्कम आढळली तर त्याची पावती आणि ती कोठून कोणत्या ठिकाणी नेली जात आहे, याची माहिती देणे बंधनकारक असते. मात्र अशा प्रकारची कोणतीही चौकशी झालेली गेल्या पंधरा दिवसात सापडलेल्या पैशाबद्दल दिसलेली नाही.
एवढेच नाही तर आचारसंहितेची अंमलबजावणी सुऊ झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त केली. सत्ता आणि खुर्चीने झपाटलेल्या या राजकारण्यांनी पाण्यासारखा पैसा फेकण्यास सुऊवात केली आहे. पोलिसांनी ज्या रकमा पकडल्या, त्या वरवरच्या आहेत. कोट्यावधींची रक्कम तर यापूर्वीच जिरविली आहे. मतांची टक्केवारी वाढण्याकरीता प्रत्येक उमेदवाराचे पैसे खर्च करण्याचे बजेट 50 ते 100 कोटी ऊपयांच्या घरात आहे. यामुळे वऊन दिसत नाही मात्र टेबलाखालून बराच पैसा ओतला गेला असल्याचे आढळून येत आहे. गोरगरिब जनतेने कष्टाने मिळविलेला पैसा आज त्याच गोरगरीब जनतेचे लचके तोडीत हे राजकारणी वापरत आहेत. तर याला खुलेआमपणे तपास यंत्रणातील माफीया देखील साथ देत आहेत.
- अमोल राऊत