काळ्यादिनाचे महाराष्ट्रातही पडसाद
पुणे, मुंबई, सातारा येथे लाक्षणिक धरणे
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह 865 गावांचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करावा, या मागणीसाठी व सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्यादिनी सीमावासीयांना पाठिंबा म्हणून रविवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. याचबरोबर मुंबई व सातारा येथेही सीमावासीयांनी आंदोलन केले.
यावेळी उत्तम तरळे, विजय पाटील, एस. आर. पाटील, उदय पाटील, बाबासाहेब पाटील, रूपेश सुळकर, व्यंकाप्पा पाटील, संतोष पाटील, आराध्या गणपत पाटील, हणमंत पाटील यांनी आपले विचार मांडले. सीमाभागातील बांधवांच्या लढ्याला पुणेकरांचा पाठिंबा आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असे सर्व वक्त्यांनी सांगितले. या धरणे आंदोलनाची सांगता आराध्या वैराळ सुळकर हिच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा“ या स्फूर्तीदायी महाराष्ट्रगीताने झाली.
यावेळी गणपत पाटील, सातेरी पाटील, मारुती पाटील, वैराळ सुळकर, अर्जुन वीर, गंगाराम वीर, संतोष कुंभार, नारायण पाटील, शिवाजी चंदगडकर, राहुल चन्नेवाडकर, संदीप बिडकर, हणमंत पाटील, नितीन कुर्लिंग, भरत पाटील, एम. सी. पाटील, परशराम पाटील, संदीप बर्वे, चंद्रकांत काकडे, आर्य वारुनेकर व मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांचे सहकारी संदीप बर्वे, सोनालीताई आदी उपस्थित होते.

समृद्धी महामार्गावर सीमाप्रश्नाच्या घोषणा देताना कार्यकर्ते.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे काही कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून सहलीसाठी गेले होते, त्या ठिकाणीही त्यांनी काळ्यादिनाच्या घोषणा दिल्या. समृद्धी महामार्गावर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. युवा समितीचे उपाध्यक्ष वासू सामजी, मध्यवर्तीचे सदस्य अनिल पाटील, सुरेश राजूकर, जोतिबा मुतगेकर, सुनील पाटील, अनंत गर्डे, राजाराम निलजकर, गंगाराम पावटे, सुभाष गवी यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र एकीकरण समिती सातारा विभागातर्फे काळादिन
1 नोव्हेंबर काळ्यादिनानिमित्त म. ए. समिती (सातारा विभाग) यांच्याकडून दंडाला काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सातारास्थित बेळगाववासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने परशुराम पाखरे, शंकरराव गाडेकर, बाळकृष्ण (कल्लाप्पा) साळुंखे, नारायण गोडसे, राजू भुजंग बरूकर, बळीराम यळ्ळूरकर, केदारी पाटील, सुरेश पाटील यांची उपस्थिती होती.
15
