पाकिस्तानच्या दोन शहरांवर बीएलएचा कब्जा
55 सैनिक मारल्याचा बलूच लिबरेशन आर्मीचा दावा
वृत्तसंस्था/ पेशावर
पाकिस्तानच्या बलूच प्रांतात बलूच लिबरेशन आर्मीने माच आणि बोलन शहरांमध्ये सैन्यतळांवर हल्ले केले आहेत. माचमध्ये झालेल्या हल्ल्यात कमीतकमी 45 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच बीएलएने दोन्ही शहरांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. तर पाकिस्तानने एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नसल्याचे म्हणत जीवितहानी लपविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
ऑपरेशन दारा-ए-बोलन अंतर्गत मागील 15 तासांपासून माच शहर आणि आसपासच्या भागांवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. याचबरेबर बीएलएच्या विशेष सामरिक पथकाने क्षेत्रातील सर्व मार्गांवर नियंत्रण मिळविले आहे. बलूचांनी अनेक सैनिकांना कैद केले असून या शहरांच्या बाहेर भूसुरुंग पेरण्यात आले असल्याचा दावा बीएलएने केला आहे.
ऑपरेशन दारा-ए-बोलनदरम्यान चार बलूच कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. हे चारही बीएलए मजीद ब्रिगेडचे आत्मघाती सदस्य होते. बीएलएने बलूच युवांना संघटनेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. भ्याड शत्रूच्या हातून दररोज छळ करवून घेण्याऐवजी बलूच स्वातंत्र्यसेनानींच्या श्ा़sdरणीत सामील व्हावे असे आवाहन बीएलएकडून करण्यात आले आहे.