महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भाजपचा विजय निश्चित!

10:55 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांचा विश्वास

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विकासात्मक काम केले आहे. याचीच पोचपावती म्हणून बेळगावमधील मतदार या वेळेला मोठ्या मताधिक्याने भाजपला पुन्हा विजयी करतील. काँग्रेसकडे नेतृत्व नसल्यामुळे त्यांचा मतदारांवर प्रभाव पडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपचा विजय नक्की असल्याचा विश्वास भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी रविवारी रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित सभेत व्यक्त केला. भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी रविवारी दिवसभरात बेळगाव शहर व उपनगरात विविध ठिकाणी प्रचार केला. विविध समाजघटकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अनगोळ येथील रामनाथ मंगल कार्यालयात झालेल्या सभेत मतदारांना आवाहन करत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची मागणी त्यांनी केली. रविवारी सकाळी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवबसवनगर परिसरात विविध समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर पांगुळ गल्ली येथील जैन मंदिराला भेट देऊन जैन समाजबांधवांशी संवाद साधण्यात आला. भाजप कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. महांतेशनगर, शिवतीर्थ कॉलनी येथील बसव मंटपात निवडणुकीसंदर्भात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लिंगायत समाजातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article