For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपच्या यशाचा शुभारंभ गुजरातमध्ये

06:25 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपच्या यशाचा शुभारंभ गुजरातमध्ये
Advertisement

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळत असून या यशाचा श्रीगणेशा गुजरातमध्ये झाला आहे. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मतगणनेआधीच निर्विरोध निवडून आले आहेत. गुजरातने आपण 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांपेक्षाही यंदा एक पाऊल पुढे टाकले आहे, अशी भलावण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ते या राज्यातील पोरबंदर येथे प्रचारसभेत भाषण करीत होते. मतदानाच्या प्रथम आणि द्वितीय टप्प्यांमध्ये काँग्रेसचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. तो पक्ष निराश झाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.

Advertisement

पोरबंदर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघासह राजकोट येथील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी शहांनी प्रचार केला. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरातने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व 26 जागांवर विजय मिळवून दिला. यंदाही याच यशाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताला महासत्ता बनविण्याचे ध्येय

Advertisement

येत्या पाच वर्षांमध्ये भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने देशातील गोरगरीबांसाठी अनेक कल्याणकारी योजना लागू केल्या. त्यामुळे गरीबांचे जीवनमान सुधारले. देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्प साकारण्यात आले. महामार्ग, बंदरे, विमानतळ, रुग्णालये, महाविद्यालये , शाळा इत्यादी निर्माणकार्य मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. ही सारी कामगिरी लोकांच्या दृष्टीसमोर आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे महत्व प्राप्त करुन देण्याची आमच्या सरकारची योजना आहे. त्यासाठी या देशातील आणि गुजरातमधील जनतेने पुन्हा एकदा आमच्या सरकारला घवघवीत यश द्यावे, असे आवाहनही अमित शहा यांनी केले आहे.

वेणुगोपाल यांची मार्क्सवाद्यांवर टीका

ग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील मित्रपक्ष असणाऱ्या मार्क्सवादी नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. शुक्रवारी केरळमध्ये सर्व 20 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. मार्क्सवाद्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या डाव्या पक्षांच्या आघाडीने निवडणूक प्रकियेत ढवळाढवळ केली. मतदान यंत्रे आणि इतर सामग्री पळविली, असा आरोप त्यांनी केला आहे. केरळमध्ये या लोकसभा निवडणुकीत मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले होते. हा चिंतेचा विषय आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. मतदान कमी होण्यासाठी डाव्या आघाडीने प्रयत्न केले. या आघाडीने पद्धतशीरपणे आपली यंत्रणा राबवून विरोधी मतदारांना मतदान करण्यापासून दूर ठेवले. तरीही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी राज्यात सर्व 20 जागा जिंकणार आहे. डाव्यांच्या कारस्थानामुळे कोणतीही हानी होणार नाही, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

5 टक्के यंत्रे खराब

काँग्रेसची बलस्थाने असणाऱ्या भागांमध्ये अनेक मतदानकेंद्रांवर मतदानयंत्रे खराब होण्याच्या घटना घडल्या. मतदानासाठी तास-तासभर उशीर झाला. त्यामुळे अनेक लोक कंटाळून मतदान न करताच घरी परत केले. राज्यात पाच टक्के मतदानयंत्रांमध्ये मतदान सुरु असतानाच दोष निर्माण झाले. याचा परिणाम मतदानाची टक्केवारी घसरण्यात झाला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा केरळमध्ये 5 टक्के मतदान कमी झाले आहे. मतदानातील ही घट हेतुपुरस्सर घडवून आणण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसने शनिवारी केला.

भाजप-डाव्यांचे छुपे संगनमत

काँग्रेसला पराभूत करण्यासाठी डाव्या पक्षांनी भारतीय जनता पक्षाशी छुप्या पद्धतीने संधान बांधले होते, असाही आरोप वेणुगोपाल यांनी केला. या दोन्ही पक्षांनी अनेक मतदारसंघांमध्ये आतून एकमेकांना सहकार्य केले. तरीही काँग्रेसला ते संपूर्ण विजयापासून रोखू शकणार नाहीत, असाही दावा त्यांनी केला.

Advertisement
Tags :

.