महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘हिंडोली’ विजयासाठी भाजपची खास रणनीति

05:23 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चांदना यांच्यासमोर प्रभुलाल यांचे आव्हान

Advertisement

राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यातील हिंडोली हा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. हा मतदारसंघ गेहलोत सरकारमधील क्रीडामंत्री अशोक चांदना यांचा बालेकिल्ला आहे. याचमुळे भाजपने त्यांच्या विरोधात माजी मंत्री प्रभुलाल सैनी यांना उभे केले आहे. सैनी यांना अंताऐवजी हिंडोली मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. हिंडोली मतदारसंघात भाजपला सलग दोन निवडणुकांमध्ये अपयश आले आहे. याचमुळे भाजपने येथे विजय मिळविण्याच्या दृष्टीकोनातून प्रदेश उपाध्यक्ष प्रभुलाल सैनी यांना मैदानात उतरविले आहे. प्रभुलाल सैनी हे यापूर्वी जिल्हयातील नैनवा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. हिंडोली मतदारसंघ हा माळी समुदायबहुल आहे. अशा स्थितीत या निवडणुकीत चांदना यांना प्रभुलाल सैनी यांच्याकडून मोठे आव्हान मिळू शकते.

Advertisement

10 वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात

हिंडोली मतदारसंघात 2013 आणि 2018 या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसने यश मिळविले होते. दोन्हीवेळा अशोक चांदना हेच आमदार म्हणून निवडून आले होते. यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात 55 हजार गुर्जर मतदार असल्याने चांदना यांना मोठा जनाधार प्राप्त आहे.

प्रभुलाल सैनीही तुल्यबळ

प्रभुलाल सैनी यांनी 2008 च्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते हरिमोहन शर्मा यांना पराभूत केले होते. तर 2013 च्या निवडणुकीत सैनी  बांरा जिल्ह्यातील अंता मतदारसंघात उभे राहिले होते, तेथे त्यांनी प्रमोद जैन भाया यांच्यावर मात केली होती. परंतु 2018 च्या निवडणुकीत जैन यांना स्वत:च्या पराभवाचा वचपा काढत सैनी यांच्यावर विजय मिळविला होता.

भाजपकडून विशेष तयारी

हिंडोली मतदारसंघातील स्थिती पाहता भाजपने प्रभुलाल सैनी यांनाच मैदानात उतरविले आहे. प्रभुलाल सैनी यांना मतदारसंघातील जातीय समीकरणे अनुकूल असल्याचे मानले जाते. मतदारसंघात एकूण 2 लाख 50 हजारांहून अधिक मतदार आहेत. येथे अनुसूचित जातीचे 70 हजार मतदार आहेत. याचबरोबर येथे गुर्जर आणि माळी समुदायाचे प्रत्येकी 55 हजार मतदार आहेत. मुस्लीम मतदारांची संख्या 30-32 हजारांदरम्यान असल्याने त्यांनाही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मीणा समुदायाच्या मतदारांची संख्या 50 हजारांच्या आसपास आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article