For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Politics : भाजपची अवस्था 'पिंजरा' सारखी : आ. जयंतराव पाटील यांची टिका

04:46 PM Jan 09, 2026 IST | NEETA POTDAR
sangli politics   भाजपची अवस्था  पिंजरा  सारखी   आ  जयंतराव पाटील यांची टिका
Advertisement

                           जयंत पाटीलांचा भाजपा-एमआयएम युतीवर तीक्ष्ण टीका

Advertisement

सांगली : भाजपा सांगतात ते हिंदुत्ववादी आहेत आणि अकोल्यात एमआयएम सोबत युती करतात. ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसतात. यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, हे लक्षात घ्या. सत्तेसाठी कोणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही. कॉंग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजपा आता काँग्रेसयुक्त झाला आहे. पिंजरा नावाच्या चित्रपटासारखी भाजपची अवस्था झाली आहे.

ये बंद करने आए थे तवायफोके कोठे, मगर सिक्को की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे... अशी धारदार टिका राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी अभय नगर येथीलप्रचार सभेत केली.स्वच्छ विचारांचे आणि मनगु आबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक असणारे उमेदवार आम्ही प्रभाग क्रमांक ९ मध्ये उभे केले आहेत. या शहरात जो विकास झाला तो कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेला आहे. रक्त तपासणीसाठी सर्व व्यवस्था आपण मोफत किंवा माफक दरात शहरात उपलब्ध करून दिली. बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी बाजार कट्टा निर्माण केला. वॉलनेसवाडी हॉस्पिटलला सुमारे पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. आरोग्य शिबिरे घेतली.

Advertisement

कृष्णघाट उभारला. सांगली मिरज चौपदरीकरणाची सुरुवात केली. सांगलीला डीएसपी कार्यालय उभारले. घरपट्टी
वाढीविरोधात आवाज उठवला. ड्रेनेजसिस्टीमसाठी मंजुरी मिळवली. भाजपला एकदा विचारा तुम्ही आठ वर्षात काय केले? भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी वेगवेगळ्या आघाड्या एकत्र येऊन सत्ता बनवण्याचे नाकारल्याचे उदाहरण आहे. मात्र आज भाजपा काय करतेय? सगळे कॉंग्रेसमधील ओढून भाजपात नेले आहेत. आता आपले गडी देखील तिथे चाललेत.

काँग्रेस सर्व धर्मभावाचाविचार घेऊन चालते म्हणून तुम्ही साथ दिली. काँग्रेस सोडून जातीयवादी झेंडा घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने दहा वेळा विचार करायला पाहिजे. मात्र दुर्दैवाने ती परिस्थिती नाही. नीतिमूल्याची जाणीव असण्प्रया व्यक्तीला मतदान करा. साध्या मनाची, सुशिक्षित उमेदवार आम्ही दिले आहेत. ज्यांनी पक्ष बदलले त्यांना हिसका दाखवा. विचाराच्या मागे सांगली राहते हे दाखविण्याची हीच वेळ आहे.

यावेळी माजी मंत्री विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील, संजय बजाज, शेखर माने, जितेश कदम, राहुल पवार उमेदवार मनगु सरगर, विनायक रुपनर, आसमा फकीर, वृषाली पाटील, अमिर खाटीक आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.