Solapur Municipal Corporation Election Results : सोलापूर महापालिकेत प्रभाग १ मध्ये भाजपचा दणदणीत विजय
सोलापूर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीला प्रभाग १ मध्ये पराभव
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल शुक्रवार सकाळपासून जाहीर करण्यात येत आहे यात प्रभाग क्रमांक एकच्या चारही जागांचे निकाल हाती आले असून, या प्रभागातील भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.प्रभाग क्रमांक एक मध्ये गौतम कसबे यांना 8451 मते मिळाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे रवींद्र गायकवाड यांना 3802 मते मिळाले आहेत. 4655 मते अधिकची घेऊन गौतम कसबे हे विजयी झाले आहेत.
प्रभाग एक ब मध्ये भाजपच्या राजश्री कणके या 9749 मते घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या किरण रूपनर यांना 4047 मते मिळाली आहेत. कणके यांनी रुपनर यांच्या पेक्षा 5002 मते अधिक घेऊन विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक एक क मध्ये भाजपच्या पुनम काशीद यांनी 8029 मते घेतली आहेत, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या शीलवंता गायकवाड यांनी 3596 ते घेतली आहेत यामध्ये पुनम काशीद या 4463 मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक एक ड मध्ये भाजपचे अविनाश पाटील यांना 7047 मत पडली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे सुहास सावंत यांना 3896 मते मिळाले आहेत. या प्रभागात भाजपचे अविनाश पाटील 3171 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.
या प्रभागामध्ये मुख्यता भाजप आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्हीमध्ये लढत झाल्याचे चित्र आहे.त्याशिवाय अपक्ष उमेदवार विजय गादेकर, अमरनाथ बिराजदार, सुकन्या तांबे यांनीही दीड हजार ते 3000 दरम्यान मते घेतली आहेत. साधारण 8304 मते घेतली आहेत
शिवाय प्रभाग एक मध्ये जवळपास 1548 मते ही नोटाला पडली आहेत.