माजगाव सरपंच निवडणुकीत भाजपच्या रंजना कानसे विजयी
11:07 AM Apr 29, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
रंजना कानसे यांना 882 मते तर जयश्री सावंत यांना 724 मते
Advertisement
ओटवणे : प्रतिनिधी
माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या रंजना रवींद्र कानसे यांनी अपक्ष जयश्री दिनेश सावंत यांचा १५८ मतांनी पराभव करीत विजय मिळविला. अवघे ४०.११ टक्के मतदान झालेल्या या निवडणुकीत एकूण ४१८५ मतदारांपैकी १६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ७८२ महिला मतदारानी तर ८९७ पुरुष मतदारांचा समावेश होता. या निवडणुकीत रंजना रवींद्र कानसे यांना 882 मते तर जयश्री दिनेश सावंत यांना 724 मते मिळाली.
Advertisement
Advertisement