For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचा उबाठा शिवसेनेला आणखी एक धक्का

02:09 PM Jan 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
भाजपचा उबाठा शिवसेनेला आणखी एक धक्का
Advertisement

खारेपाटण जिल्हा परिषदमधून भाजपच्या प्राची इस्वलकर बिनविरोध

Advertisement

कणकवली / प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने कणकवली तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे खारेपाटण जिल्हा परिषदमधून भाजपच्या उमेदवार प्राची इस्वलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.तालुक्यात बिडवाडी पंचायत समिती मधून उबाठा शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरल्याने तेथून भाजपच्या संजना राणे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर वरवडे पंचायत समिती मधून उबाठा शिवसेनेचे उमेदवार सुधीर सावंत व मनसेचे उमेदवार शांताराम सादये यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवार राजेश उर्फ सोनू सावंत यांची ही बिनविरोध निवड झाली होती. आता उबाठाच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवार प्राची इस्वलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.