महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘धेंपे ब्रँड’च्या वापराने निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव : सरदेसाई

11:59 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : भाजपला ज्या ठिकाणी संधी नसते त्या ठिकाणी संधी निर्माण करण्याचे काम भाजप करतो. गोव्यात धेंपे हे मोठे नाव आहे. याच धेंपे ब्रँडचा वापर करून भाजप दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणूक जिंकू पाहत आहे. काँग्रेसने अजूनपर्यंत  उमेदवार जाहीर केलेला नाही आणि भाजप कार्यकर्ते किती प्रचारकार्य करतात त्यावर पुढे सर्व काही अवलंबून आहे. पण आपण भाजपसोबत नसणार, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. होळी रंगपंचमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली असता पत्रकारांशी बोलताना सरदेसाई यांनी वरील प्रतिक्रिया देत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीतील उमेदवार म्हणून भाजपने पल्लवी धेंपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले आहे. त्यावर भाष्य करताना सरदेसाई म्हणाले की, भाजपने कित्येक आमदारांना पक्षात प्रवेश दिलेला आहे. त्यानंतरही त्यांना दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणूक जिंकण्याची आशा नाही. ज्यांनी लोकांचा विश्वासघात केलेला आहे त्यांना लोकांच्या दारावर नेल्यास लोक मते देणार नाहीत. या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींनी धेंपे या ब्रँडचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे त्यांनी सांगितले. जी नावे पक्षाकडून दक्षिण गोव्यातील उमेदवारीसाठी दिल्लीला पाठवलेली होती त्यातील एकाही नावावर भाजप जिंकू शकत नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी नारीशक्तीला पुढे आणण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजप महिला मोर्चाकडेही निवडणूक जिंकू शकेल असे एकही नाव नव्हते. त्यामुळेच पल्लवी धेंपे हे नाव पुढे आणलेले आहे. भाजपच्या पक्ष चिन्हाचा एवढा प्रभाव असता, तर आपण आमदार म्हणून निवडूनच आलो नसतो. आपण एकदा अपक्ष या नात्याने मेणबत्ती व दोनदा नारळ या चिन्हावर निवडणूक लढवून जिंकलेलो आहे. त्यामुळे गोव्यातील सुशिक्षित जनतेला सर्व माहिती आहे. मतदार विचारपूर्वक मतदान करतात, असेही सरदेसाई म्हणाले.

Advertisement

राज्यसभा खासदारकीसाठी बाबा धेंपे यांचे नाव सूचविले होते

Advertisement

बाबा धेंपे यांचे सर्व राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत. आपलेही ते मित्र आहेत. स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना बाबा धेंपे यांचे नाव राज्यसभा खासदारकीसाठी आपण आणि सुदिन ढवळीकर यांनी सूचित केले होते, असे सरदेसाई यांनी सांगितले. बाबा आपले मित्र म्हणता, तर तुम्ही कोणाला पाठिंबा देणार, अशी विचारणा केली असता, बाबा कोणाचे मित्र नाहीत हे सांगा, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. निवडणुका आणि निवड (नॉमिनेशन) यात मोठा फरक आहे. मी कोणाला पाठिंबा देणार ते तुम्हाला माहीतच आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article