For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Krushnaraj Mahadik | भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा; कृष्णराज महाडिक यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी

02:14 PM Feb 24, 2026 IST | NEETA POTDAR
krushnaraj mahadik   भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा  कृष्णराज महाडिक यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी
Advertisement

                              स्थानिक निवडणुकांनंतर भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर

Advertisement

मुंबई : भारतीय जनता पक्षच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी अखेर नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या संघटनेत त्यांनी काही महत्त्वपूर्ण बदल करत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच कार्यकारिणी जाहीर होईल, अशी चर्चा सुरू होती. त्यानुसार आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत संघटनात्मक समतोल राखण्याचा प्रयत्न दिसून येतो. विशेष म्हणजे, कोल्हापूरमधील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले आणि YouTubeवर व्लॉगिंगमुळे लोकप्रिय झालेले कृष्णराज महाडिक यांच्यावर भाजप युवा मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Advertisement

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरूनही माघार घ्यावी लागलेले महाडिक यांना पक्षाने महत्त्वाची संघटनात्मक भूमिका दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवा मोर्चातूनच केली होती. त्यामुळे महाडिक यांची नियुक्ती भविष्यातील नेतृत्व घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

नव्या कार्यकारिणीत युवा पिढीला संधी देत पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत या निर्णयातून मिळत आहेत.

Advertisement
Tags :

.