For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपची 1 सप्टेंबरपासून राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम

06:58 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपची 1 सप्टेंबरपासून राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम
Advertisement

विनोद तावडे यांच्यावर अभियानाची जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची अधिकृत प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी भाजप 1 सप्टेंबरपासून देशभरात पक्षाची राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम सुरू करणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या सरचिटणीसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांना पक्षाच्या सदस्यत्व अभियानाचे प्रभारी बनवण्यात आले. यासोबतच न•ा यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शनिवारी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अजेंड्यालाही मंजुरी देण्यात आली.

Advertisement

भाजपमध्ये सदस्यत्व मोहिमेनंतरच संघटनेच्या निवडणुका घेतल्या जातात. पक्षाच्या घटनेनुसार सदस्यत्व मोहिमेनंतर मंडल, जिल्हा आणि राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यंत अध्यक्षाची निवड केली जाते. त्या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणी मोहीमेला नजिकच्या काळात गती दिली जाणार आहे. जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रीय सरचिटणीसांच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष आणि राष्ट्रीय संयुक्त संघटन सरचिटणीस शिवप्रकाश यांच्याशिवाय राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, राधामोहन दास अग्रवाल, विनोद तावडे, तऊण. चुग, अऊण सिंग आणि दुष्यंत गौतम सामील झाले.

संघटनात्मक निवडणुकीवर सविस्तर चर्चा

दिल्लीत शनिवारी दुपारी 2 वाजता भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाध्यक्ष जे. पी. न•ा आणि अमित शहा यांच्याशिवाय पक्षाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, राज्यांचे प्रभारी, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश संघटन सरचिटणीसही उपस्थित होते. या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय सदस्यत्व मोहिमेसोबतच संघटनेच्या निवडणुकांबाबतही चर्चा झाली. राष्ट्रीय महासचिवांच्या बैठकीत हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

.