सरकारविरोधात भाजपची 1 सप्टेंबरपासून पदयात्रा
प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांची बेंगळूर येथे पत्रकार परिषदेत माहिती
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर : राज्य सरकारच्या अपयशाविरुद्ध राज्यातील जनतेत जागृती करण्यासाठी राज्य भाजपच्यावतीने 1 ते 10 सप्टेंबरपर्यंत पदयात्रेचे आयोजन केले आहे. रायचूर ते बळ्ळारी दरम्यान सुमारे 170 कि. मी. लांबीची ही पदयात्रा असेल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिली.
मंगळवारी बेंगळूरच्या मल्लेश्वरम येथील प्रदेश भाजप कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना राज्याच्या विकासाची काळजी नाही. शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबांसाठी योजनांचा अभाव, रोजगार निर्मितीतील अपयश, आरक्षणाची अंमलबजावणी, उत्तर कर्नाटकाच्या समस्या या बाबतीत त्यांना रस नाही. याबद्दल राज्यातील जनतेला माहिती देण्यासाठी व सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी ही पदयात्रा आयोजिण्यात आली आहे, असे ते म्हणाले. पदयात्रेला 1 सप्टेंबर रोजी रायचूर येथून प्रारंभ होईल. त्याची सांगता बळ्ळारी येथे होणार आहे.