महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची सरशी

06:45 AM Nov 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

15 राज्यांमधील 46 विधानसभा जागांवर लढती : ‘एनडीए’चा 24 जागांवर विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांसोबतच 15 राज्यांतील 46 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीची मतमोजणीही शनिवार पार पडली. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने सरशी मिळविल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 9 जागांपैकी भाजप आघाडीने 7 तर समाजवादी पार्टीला 2 जागा मिळाल्या आहेत. 46 जागांपैकी भाजप आघाडी 24, काँग्रेस 7, टीएमसी 6, सपा 3, आप 3, सीपीआय-एम, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि भारत आदिवासी पक्ष प्रत्येकी 1 जागेवर आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनडीएमध्ये मध्ये जेडीयू, हिंदुस्थान अवाम मोर्चा, आसाम गण परिषद, युनायटेड पीपल्स पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांचा समावेश आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी 46 पैकी 27 जागा विरोधकांकडे होत्या. त्यापैकी एकट्या काँग्रेसला 13 जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी एनडीएकडे भाजपच्या 11 जागांसह एकूण 17 जागा होत्या. अशा प्रकारे भाजप आघाडीला एकूण 7 जागांचा फायदा झाला आहे. तथापि, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले वनमंत्री रामनिवास रावत यांचा मध्यप्रदेशातील विजयपूर मतदारसंघातून पराभव झाला.

राजस्थानात भाजपला 5, बंगालमध्ये टीएमसीला 6

राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने पाच जागा जिंकल्या आहेत, तर भारत आदिवासी पक्षाने एका जागेवर विजय मिळवला आहे. दौसा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दीनदयाल विजयी झाले आहेत. पश्चिम बंगालमधील सहा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत टीएमसीने सहा जागा जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी पाच तर भाजपच्या उमेदवारांनी एक जागा जिंकली होती.

मध्यप्रदेशातील विजयपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मुकेश मल्होत्रा विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे रामनिवास रावत यांचा सात हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. मध्यप्रदेशातील बुधनी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे रमाकांत भार्गव विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे निकटचे काँग्रेसचे उमेदवार राजकुमार पटेल यांचा 13 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

पंजाबमध्ये ‘आप’ला 3, काँग्रेसला एक जागा

पंजाबच्या चार विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने तीन जागा (डेरा बाबा नानक, छब्बेवाल, गिद्दरबाहा) जिंकल्या आहेत, तर काँग्रेसच्या उमेदवाराने एका जागेवर (बरनाला) विजय मिळवला आहे. आसाममधील बेहाली विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झाला आहे. भाजप उमेदवार दिगंत घाटोवाल यांना 50,947 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या जयंता बोराह यांचा 9,051 मतांनी पराभव केला.

छत्तीसगडमधील स्थिती

छत्तीसगडमधील रायपूर सिटी दक्षिण मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील कुमार सोनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा 46 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. बेलागंजची जागा एनडीएने जिंकली होती. येथे जेडीयूच्या मनोरमादेवी विजयी झाल्या आहेत. त्यांना 73,334 मते मिळाली. मनोरमादेवी यांनी आरजेडीच्या विश्वनाथ कुमार सिंह यांचा 21,391 मतांनी पराभव केला. इमामगंजमधून केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांची सून दीपा मांझी 53,435 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांनी आरजेडीचे रोशन कुमार यांचा 5,945 मतांनी पराभव केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article