भाजपचे कुणकेरी बूथ प्रमुख शिवसेनेत
शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत प्रवेश
सावंतवाडी । प्रतिनिधी
कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे कुणकेरी येथील बूथ प्रमुख रामचंद्र परब यांनी पुन्हा एकदा शिंदे शिवसेनेत प्रवेश करत घरवापसी केली आहे. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला . नगरपरिषद निवडणूक संपताच जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश घेत संजू परब यांनी पुन्हा एकदा भाजपाला धक्का देण्यास सुरुवात केली आहे.कुणकेरी येथील भाजपचे बुथ प्रमुख रामचंद्र परब यांनी आपण गटातटाच्या राजकारण आणि मनमानी कारभाराला कंटाळून पुन्हा एकदा शिंदे शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. यापुढे कुणकेरी गावामध्ये शिंदे शिवसेनेला बळकटी देण्यासाठी आपण काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी जिल्हाप्रमुख श्री परब यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे शिंदे शिवसेनेमध्ये स्वागत केले तसेच पक्ष सर्वतोपरी तुमच्या मागे उभा राहील असे आश्वासन दिले. यावेळी उपतालुकाप्रमुख राकेश पवार, अक्षय पार्सेकर यांच्यासह कुणकेरी विभागप्रमुख महेश सावंत, झेवियर फर्नांडिस ,अमर कुणकेरकर, किरण तेंडुलकर ,दीपक पार्सेकर,सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते.