निरंजन डावखरेंच्या विजयानंतर भाजपचा सावंतवाडीत जल्लोष
सावंतवाडी | प्रतिनिधी
कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले महायुतीचे निरंजन डावखरे यांना निश्चितपणे सावंतवाडी मतदारसंघात जनतेच्या भेटीसाठी आणि पदवीधर शिक्षकांच्या भेटीसाठी आणण्यात येणार आहे. पूर्वी ते कमी प्रमाणात येथे आले असतील पण, आता निश्चितपणे दर दोन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी ते सावंतवाडी मतदारसंघात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करतील आणि तसा आग्रही आम्ही त्यांना करू असे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी स्पष्ट केले. श्री डावखरे लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर त्यांच्या विजयाचा जल्लोष फटाके फोडून पेढे वाटून सावंतवाडी शहरात युवा मोर्चा भाजपच्या वतीने करण्यात आला. यावेळी विशाल पर पत्रकारांशी बोलताना म्हणाले , मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला आहे. या विजयामागे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या विजयासाठी सर्वाना प्रेरित केले आणि त्याचे हे यश मिळालं आहे . खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच हे यश मिळाले आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेची निवडणूक आणि पदवीधर निवडणुकीत निवडणुका भाजपला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. यापुढे भाजप कोकणात सर्व निवडणुकीत विजयी झालेले दिसेल. असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, केतन आजगावकर, दिलीप भालेकर ,अमित परब, पुंडलिक कदम ,उमाकांत वारंग ,आदी उपस्थित होते.