For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिरजकर तिकटी येथे भाजपचा आनंदोत्सव

11:15 AM Dec 06, 2024 IST | Pooja Marathe
मिरजकर तिकटी येथे भाजपचा आनंदोत्सव
BJP's joyous celebration at Mirajkar Tikti
Advertisement

कोल्हापूर

Advertisement

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्द्ल भाजपच्यावतीने मिरजकर तिकटी येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबईतील आझाद मैदानातील शपथविधी सोहळ्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला. एकमेकांना मिठाई भरवत भारतीय जनता पार्टीचा विजय असो, 'देवेंद्रजी तुम आगे बढो, हम तुमारे साथ है' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

विधानसभा निवडणुकीत एकहाती वर्चस्व मिळवलेल्या महायुती सरकारचा गुरुवारी सायंकाळी मुंबईतील आझाद मैदानावर महाशपथविधी सोहळा झाला. या सोहळ्यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनाही सहभागी होता यावे, यासाठी मिरजकर तिकटी येथे शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सोहळा पाहण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी गर्दी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला.

Advertisement

यावेळी भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य राहूल चिकोडे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, हेमंत आराध्ये, भाऊ कुंभार, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, अतुल चव्हाण, अवधुत भाट्यो, गायत्री राऊत, धनश्री तोडकर, रश्मी साळोखे, अनिरुद्ध कोल्हापूरे, प्रसाद नरुले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.