For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवणात भाजपची भव्य प्रचार रॅली

06:53 PM Dec 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मालवणात भाजपची भव्य प्रचार रॅली
Advertisement

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार रॅलीत सहभागी

Advertisement

मालवण प्रतिनिधी

मालवण शहरातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपकडून शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप फोवकांडा-पिंपळ येथे जाहीर प्रचार सभेने करण्यात आला. सकाळी भरड दत्त मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली होती. यात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा यतीन खोत व नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार तसा भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मी राज्यभर प्रचारसभा केल्या, अनेक रॅली केल्या आणि आता मालवणला आलो आहे. सगळीकडे प्रतिसाद उत्तमच होता. पण प्रचंड प्रतिसाद मला मालवणमध्ये दिसतोय, मालवणकरांचा दिसतोय. मालवणकरांच्या मनात आता ठरले आहे, की विजय भारतीय जनता पक्षाचा होणार आहे, असा विश्वास सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेनिमित्ताने बोलताना केला.यावेळी भाजप नेते अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, बाबा परब, अशोक सावंत, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, रणजीत देसाई, संतोष लुडबे, आपा लुडबे, अंजना सामंत, राजू परूळेकर, दाजी सावजी, अजिंक्य पाताडे तसा इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तसा भाजप उमेदवार मंदार केणी, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, अमृता फाटक, सुवर्णा वालावलकर, पंकज सादये, रोहन पेंडुरकर, संतोषी कांदळकर, यतीन खोत, महानंदा खानोलकर, चंद्रशेखर कुशे, महिमा मयेकर, सौरभ ताम्हणकर, दिपाली वायंगणकर, संतोष शिरगावकर, मरीना फर्नांडिस, सन्मेष परब, अन्वेषा आचरेकर, आबा हडकर, सेजल परब आदी उपस्थित होते. यावेळी भाजप नेते अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.