कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जनतेच्या आशीर्वादासाठी सावंतवाडीतून भाजपची भव्य प्रचार रॅली

06:42 PM Dec 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी / प्रतिनिधी

Advertisement

फोटो : अनिल भिसे

Advertisement

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे सावंतवाडी शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. राजवाडा येथील पाटेकर देवस्थानचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण शहरातून ही रॅली निघाली. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी भाजपची सत्ता आवश्यक आहे, असा विश्वास आता जनतेला वाटत आहे. त्यामुळे नगरपालिकेत भाजपचाच नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येतील,असा विश्वास पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला .मतदानापूर्वी जनतेचे आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीने ही प्रचार रॅली काढण्यात आली होती. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले आहेत, असे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रद्धा सावंत-भोसले यांनी स्पष्ट केले. रॅलीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम सावंत-भोसले, विशाल परब, शहर अध्यक्ष तथा उमेदवार सुधीर आडिवरेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक ऍड. परिमल नाईक, उदय नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, राजू बेग, ऍड. अनिल निरवडेकर,
ऍड. ऋजूल पाटणकर, गोपाळ नाईक, प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, वेदिका परब, अमित गवंडळकर, दीपाली भालेकर, मेघा डुबळे, समृद्धी विर्नोडकर, ऍड. संजू शिरोडकर, दादू कविटकर, संध्या तेरसे, नीलम नाईक, सुकन्या टोपले, सुनीता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, मेहशर शेख, गोपाळ नाईक, वीणा जाधव, शेखर गावकर, गुरुनाथ पेडणेकर, रवी मडगावकर, मंदार कल्याणकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.सावंतवाडी शहराच्या विकासासाठी भरघोस निधी आम्ही देऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत-भोसले यांना आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे सावंतवाडी शहर निश्चितपणे विकासात्मक दृष्टीने महाराष्ट्रात मॉडेल ठरेल. तुम्ही विश्वासाने सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपची सत्ता आणि नेतृत्व श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हाती द्या. निश्चितपणे तुमचा विकास होईल, असे राणे म्हणाले.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # bjp #
Next Article