For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपची निवडणूक तयारी जोरात

04:11 PM May 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजपची निवडणूक तयारी जोरात
Advertisement

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांना अचानक दिल्लीचे बोलावणे : निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार

Advertisement

पणजी : गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुका डिसेंबरच्या अखेरीस होण्याची शक्यता गृहीत धरून भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक अन्य काही पदाधिकाऱ्यांसमवेत आज शनिवारी नवी दिल्लीला जात आहेत. दिल्ली भेटीत ते पक्षाध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी निवडणुकी संदर्भात चर्चा करणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी अचानकपणे गोव्यातील या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना निवडणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी बोलाविल्याने हे नेते नवी दिल्लीत कोणती चर्चा करतील, याबाबत राज्यातील जनतेची उत्सुकता वाढणार आहे. दोघेही हे आज शनिवारी सायंकाळी उशिरा नवी दिल्लीला जातील. गोव्यातील आगामी निवडणुका या डिसेंबरच्या अखेरपर्यंत घेण्याचा इरादा आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या राज्यांच्या निवडणुका देखील एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत.

राष्ट्रीय अधिवेशन गोव्यात ?

Advertisement

गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन हे साधारणत: ऑक्टोबरच्या दरम्यान गोव्यात होईल, असा अंदाज आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आतापर्यंत भाजपने अनेकवेळा गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अधिवेशन गोव्यात घेतले होते. यावेळी देखील असे अधिवेशन घेण्याचा प्रस्ताव आहे. भाजपचे अनेक नेते आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या अधिवेशनास उपस्थित राहतील. मात्र अधिवेशनाच्या तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत.

भाजपचे गोवा मुख्यालय सज्ज

भाजपचे गोव्यातील मुख्यालय कदंब पठारावर रायबंदर येथे सज्ज झालेले असून या प्रकल्पाचे उद्घाटन पुढील दोन महिन्यात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या हस्ते होणार आहे.

Advertisement
Tags :

.