For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संदेशखाली हे भाजपचे कारस्थान !

06:28 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
संदेशखाली हे भाजपचे कारस्थान
Advertisement

पश्चिम बंगालमध्ये सध्या गाजत असलेले संदेशखाली अत्याचार, बलात्कार आणि जमीन बळकाव प्रकरण हे भारतीय जनता पक्षाचेच कारस्थान आहे, अशी टीका या राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केली आहे. नडिया जिल्ह्यात एका प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

Advertisement

राज्याचे राज्यपाल आनंद बोल यांच्या लैंगिक प्रकरणासंबंधी भारतीय जनता पक्षाने मौन पाळले आहे. संदेशखालीसंबंधी मात्र हा पक्ष तृणमूल काँग्रेसवर टीका करीत आहे. यातून या पक्षाची दुहेरी भूमिका स्पष्ट होते. संदेशखाली प्रकरणातील आरोप खोटे आहेत. हे भारतीय जनता पक्षाचेच कारस्थान आहे. यामुळे राज्याची प्रतिमा मलीन होत आहे. यासंबंधी माझ्या पक्षाने एक स्टिंग ऑपरेशन केले असून त्यात भारतीय जनता पक्षाचे कारस्थान स्पष्ट होते, असा दावाही त्यांनी केला.

आपल्या दाव्याच्या पुष्ट्यार्थ त्यांनी एक व्हिडीओही प्रकाशित केला. मात्र त्या व्हिडीओसंबंधी भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला आहे. हा व्हिडीओच बनावट आहे. संदेशखाली प्रकरणातील अत्याचार आता लोकांसमोर आले आहेत. तसेच, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तृणमूल काँग्रेसला या प्रकरणामुळे फार मोठा दणका राज्यात बसणार आहे. त्यामुळे आता त्यांनी स्वत:ला वाचविण्यासाठी धडपड चालविली आहे. पण बनावट व्हिडीओ प्रसारित करुन तृणमूल काँग्रेसचे अत्याचार लपणार नाहीत, असा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.