For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणकवलीत भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला

01:05 PM Nov 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कणकवलीत भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला
Advertisement

कणकवली/ वीरेंद्र चिंदरकर

Advertisement

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू, श्री देव रवळनाथ मंदिर येथे देवाला गाऱ्हाणे घालून विजयी होण्याचा आशीर्वाद मागण्यात आला. त्यानंतर श्रीदेवी पटकीदेवी मंदिर, श्री परमहंस भालचंद्र महाराज येथे सर्व इच्छुक उमेदवार, भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट देत आशीर्वाद घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केली. प्रचाराच्या शुभारंभ वेळी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे बंडू हर्णे, राजश्री धुमाळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, अण्णा कोदे, मेघा गांगण सुप्रिया नलावडे, राकेश राणे, संजय कामतेकर विठ्ठल देसाई राजू गवाणकर, विराज भोसले, किशोर राणे, अभिजीत मुसळे, बाबू गायकवाड, गौतम खुडकर, बंडू गांगण, राजन परब, सुप्रिया नलावडे, माधवी मूरकर, मेघा सावंत, अभय राणे, कल्याण पार, भरत उबाळे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.