भाजपचे बुलडोजर कारवाईचे धोरण चुकीचे : राहुल गांधी
06:21 AM Sep 04, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली
Advertisement
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुलडोजर कारवाईप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीचे कौतुक केले आहे. मानवता आणि न्यायाला बुलडोजरखाली चिरडणाऱ्या भाजपचा घटनाविरोधी चेहरा सर्वांसमोर आला आहे. याप्रकरणी न्यायालय निर्देश जारी करत भाजप सरकारांच्या लोकशाहीविरोधी मोहिमेपासून जनतेचे रक्षण करेल अशी अपेक्षा आहे. देश राज्यघटनेनुसार चालेल, सत्तेच्या चाबकाने नाही असे राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
Advertisement
Advertisement
Next Article