For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : सांगलीत भाजपची मोठी कारवाई; बंडखोरी केल्याने 9 माजी नगरसेवक सहा वर्षांसाठी निलंबित

03:39 PM Jan 11, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत भाजपची मोठी कारवाई  बंडखोरी केल्याने 9 माजी नगरसेवक सहा वर्षांसाठी निलंबित
Advertisement

                             बंडखोरीला आळा घालण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय

Advertisement

सांगली : महापालिका निवडणुकीत बंडखोरी केलेल्या युवराज बावडेकर, कल्पना कोळेकर, सोनाली सागरे या माजी नगर सेवकांसह आठ सदस्य व पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी भाजपने तात्काळ निलंबित केले आहे. भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी ५जानेवारी रोजी आदेशाद्वारे केली. शनिवारी ती जाहीर करण्यात आली.

यांचे झाले निलंबन
निलंबितांमध्ये सुजित राजाराम काटे, युवराज सतीश बावडेकर, रविंद्र भैरू ढगे, दीपक माने, अक्षय पाटील, प्रियानंद कांबळे, सौ. कल्पना कोळेकर, सौ. सोनाली सागरे, महेश सागरे यांचा समावेश आहे. या सर्वांनी पदाधिकारी असतानाही पक्षविरोधी निवडणूक लढवून शिस्तभंग केला. पक्षाची प्रतिमा मलिन करणारे वर्तन केल्याचे स्पष्ट झाल्याचे पत्रात नमूद केले आहे. सदर बाबी गंभीर असल्याने पूर्वसूचना न देता तत्काळ सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

निलंबन काळात संबंधित व्यक्तींना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांवरून दूर ठेवण्यात आले असून, पक्षाचे नाव, चिन्ह किंवा कोणत्याही प्रकारे भाजपचे प्रतिनिधित्व करण्यास मनाई करण्यात आली आहे. यापुढे पक्षाचे नाव, चिन्ह किंवा नेतृत्वाबाबत खोटा प्रचार अथवा गैरसमज पसरविल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.