For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कवठणी उपसरपंचपदी भाजपाचे अजय सावंत विजयी

कवठणी उपसरपंचपदी भाजपाचे अजय सावंत विजयी
Advertisement

सातार्डा : कवठणी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाच्या पोटनिवडणूकीमध्ये लढतीमध्ये भाजपचे उमेदवार अजय सावंत यांनी उबाठा शिवसेनेच्या विजया कवठणकर यांना पराभूत करून उपसरपंचपदी विजयी झाले आहेत.भाजपा उमेदवार अजय सावंत यांना पाच तर उबाठा शिवसेनेच्या उमेदवार विजया कवठणकर यांना तीन मते मिळाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजन नाईक यांनी काम पाहिले.
एक वर्षभर उपसरपंचपद भूषविल्या नंतर श्रद्धा कवठणकर यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपदासाठी निवडणूक झाली. उपसरपंचपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे अजय सावंत विजयी झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती शर्वाणी गावकर यांनी उपसरपंच सावंत यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच अजय सावंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सरपंच अजित कवठणकर,माजी सरपंच दिपक कवठणकर, बाळ नाईक,श्याम नाईक, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कवठणकर,रश्मी कवठणकर श्रद्धा कवठणकर तसेच रेखा रेडकर, राजेश गावकर, अक्षता कवठणकर, सपना कवठणकर, अक्षरा सावंत, डाटा ऑपरेटर सोनाली गावकर उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.