भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी साधला कृष्णराज महाडिकांशी संवाद
प्रतिनिधी
बांदा
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या 'युवा शक्ती जागर यात्रेच्या' निमित्ताने युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी कणकवली येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आगामी कार्यासाठी त्यांचे मनोबल उंचावले.उपस्थित तरुणांना प्रोत्साहित करताना श्री. महाडिक म्हणाले की, "युवाईचा जोश, युवाईची जिद्द आणि राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चा होय." यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणीस जावेद खतीब व अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाडिक यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.या विशेष भेटीदरम्यान भाजप पदाधिकारी जावेद खतीब यांनी कृष्णराज महाडिक यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यामध्ये जिल्ह्यातील युवकांना एकत्रित करून संघटनात्मक बांधणी करणे. जिल्ह्यातील युवकांचे प्रलंबित प्रश्न आणि आव्हाने, युवा मोर्चाच्या माध्यमातून आगामी काळात राबवायचे विविध लोकोपयोगी उपक्रम आदिकडे लक्ष द्या असे आवाहन केले. या प्रसंगी बोलताना सरचिटणीस जावेद खतीब म्हणाले "खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे तसेच वरिष्ठ पदाधिकारी आणि मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करू."नवा उत्साह, नवा निर्धार याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षांच्या या भेटीमुळे जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी काळात 'युवा शक्ती जागर यात्रेच्या' माध्यमातून भाजपचा युवा गड अधिक मजबूत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.