For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Politics News | सोलापुरात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा निषेध

03:15 PM Apr 22, 2026 IST | NEETA POTDAR
solapur politics news   सोलापुरात भाजप युवा मोर्चा आक्रमक  नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा निषेध
Advertisement

                   महिला आरक्षणाला विरोध केल्याने सोलापुरात भाजपचा संताप

Advertisement

सोलापुर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने आणलेल्या नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा भारतीय जनता युवा मोर्चाने बुधवारी निषेध केला. चार हुतात्मा पुतळा चौकात जोरदार घोषणाबाजी करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी वातावरण दणाणून सोडले.

महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो, नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा धिक्कार असो, फुल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है, भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Advertisement

या निषेध आंदोलनाप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे, नगरसेविका मृण्मयी गवळी, अनिल वंगारी, यतीराज होनमाने, अर्जुन मोहिते, राहुल डांगरे, विशाल बनसोडे, रोहन मराठे, ओंकार शिंदे, देवेंद्र डेरबेरे, अंबादास पामू, डोंगरेश चाबुकस्वार, नाजनीन शेख, सायरा शेख, किरण माशाळकर, ओंकार होमकर, गणेश पवार, अनिकेत प्रधाने, समर्थ लामकाने यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.