महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राजकट्टी, शिरुर येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

11:18 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रियांकांना विजयी करण्याचे जारकीहोळींचे आवाहन

Advertisement

बेळगाव : चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना बहुमताने विजयी करावे आणि केंद्रामध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पालकमंत्री व बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. गोकाक  हिलगार्डन येथील गृह कार्यालयात राजकट्टी, शिरुर गावातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत करून मंत्री सतीश  जारकीहोळी बोलत होते. राज्यातील काँग्रेस सरकारकडून जनहिताच्या योजना राबविल्या आहेत. या योजना गोर-गरिबांसाठी वरदान ठरल्या आहेत. त्यामुळे मतदारांकडून प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मतदारांनी या निवडणुकीत उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस पक्षाकडून दिलेली आश्वासने पाळण्यात आली आहेत. पक्ष केंद्रामध्ये सत्तेत आल्यास जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल. नेहमीच पक्षाकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी पक्षावर विश्वास ठेवून पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राजकट्टी, शिरुर गावातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेवून उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी राजकुमार पुजेरी, नागाप्पा पुजेरी, इराप्पा मॅकली, दान्नाप्पा पुजेरी, सिद्धाप्पा पुजेरी, कल्लाप्पा उपानी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article