For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या

06:23 AM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या
Advertisement

तृणमूल नेत्यांनी दिली होती धमकी : ममता सरकारवर भाजपचे टीकास्त्र

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा येथे भाजप कार्यालयात काम करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. या कार्यकर्त्याचा मृतदेह पक्ष कार्यालयात आढळून आला आहे. तर याप्रकरणी एक महिलेला अटक करण्यात आली आहे. पृथ्वीराज नास्कर हा बंगाल भाजपच्या सोशल मीडियाचा संयोजक होता, त्याची हत्या धारदार अस्त्राने करण्यात आली असून त्याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisement

पृथ्वीराज नास्कर यांनी काही दिवसांपूर्वी महिला डॉक्टरवरील बलात्कार अन् हत्याप्रकरणी निदर्शने केली होती. यावरून स्थानिक तृणमूल नेत्यांनी पृथ्वीराज यांना धमकी दिली होती.  तृणमूलनेच पृथ्वीराज नास्कर यांची हत्या केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दक्षिण 24 परगण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना भयभीत करण्याचा तृणमूल काँग्रेसचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या रक्ताळलेल्या सरकारला लवकरच पायउतार केले जाणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी म्हटले आहे.

राजकीय हत्येच्या दृष्टीकोनातून तपास

पृथ्वीराज हे 3 दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह भाजप कार्यालयात टाकण्यात आला होता. मारेकऱ्याने प्रवेशद्वार आतून बंद करत पाठीमागून पळ काढला होता. प्रारंभिक तपास आणि मोबाइलच्या ट्रॅकिंगनंतर एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत महिलेने हत्येची बाब मान्य केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पृथ्वीराज यांची हत्या राजकीय कारणामुळे झाली का याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

भाजपकडून ममता सरकार लक्ष्य

ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी पृथ्वीराज यांचे अपहरण करत त्यांचा छळ केला आणि मग त्यांची हत्या केली आहे. पृथ्वीराज यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते. ममता बॅनर्जी या दहशत, हत्या आणि क्रूरतेद्वारे विरोधकांचा आवाज दडपू पाहत आहेत. ममता बॅनर्जी यांनी बंगालला एक अराजक, रक्ताने माखलेल्या लोकशाहीत बदलले आहेत. पृथ्वीराज यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक केली जात नाही, जोवर त्यांच्या परिवाराला न्याय मिळत नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही असे भाजपने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.