भाजप महिला आघाडीतर्फे पाच निवडक महिलांचा सत्कार
बेळगाव : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष महिला आघाडीतर्फे 5 महिलांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील पाच निवडक महिलांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आघाडीच्या आदेशानुसार अवयव दानाबद्दल जागृती व नोंदणी यावेळी करण्यात आली. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या योजना महिलांना विकासासाठी पूरक ठरत असल्याचे मत महिला आघाडीच्या बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षा डॉ. नयना भस्मे यांनी व्यक्त केले. त्यानंतर डॉ. सोनाली सरनोबत यांनी मत व्यक्त केले. माजी खासदार मंगला अंगडी म्हणाल्या की, महिलांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करून कार्य करीत राहिले पाहिजे. विधान परिषद माजी सदस्य सी. टी. रवी, माजी आमदार संजय पाटील, सुभाष पाटील, गीता सुतार, भाग्यश्री, राजेश्वरी यांसह भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.