Satara Zilla Parishad Election 2026 | सातारा जिल्हा परिषद निकालामध्ये भाजपने मारली बाजी; पहा संपुर्ण यादी
सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागांवर समाधान
सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या २०२६ च्या निवडणुकीत भाजपने २३ जागांवर विजय मिळवून सत्तेत आपली पकड मजबूत केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना १३ जागांवर मर्यादित राहिली, तर काँग्रेसला फक्त १ जागा, आणि इतर पक्षांना देखील १ जागाच मिळाली. तर ठाकरे गटाला या निवडणुकीत यश मिळाल्या नसल्याचे चि़ञ पाहायला मिळत आहे.
पक्षनिहाय निकाल
भाजप – २३
राष्ट्रवादी काँग्रेस – २२
शिवसेना – १३
काँग्रेस – १
इतर – १
ठाकरे गट – ०
सातारा जिल्हा परिषदेत बहुमताचा आकडा ३५ जागा असला तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आता भाजप आणि राष्ट्रवादी युतीचा किंवा लहान पक्षांचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे.भाजपच्या विजयानंतर जिल्ह्यात पक्षकार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला असून, त्यांच्या नेतृत्वाखालील रणनीती पुढील काही दिवसात निर्णायक ठरणार आहे.