For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरियाणात पुन्हा भाजपला दणदणीत यश

06:42 AM Mar 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
हरियाणात पुन्हा भाजपला दणदणीत यश
Advertisement

वृत्तसंस्था / चंदीगढ

Advertisement

हरियाणामध्ये घेण्यात आलेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यातील 10 महानगरपालिकांपैकी 9 महानगरपालिकांमध्ये या पक्षाने बहुमत मिळविले असून महापौरपदेही पटकाविली आहेत. काँग्रेसचा या निवडणुकांमध्ये धुव्वा उडाला आहे. नगरपरिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठे यश प्राप्त केल्याचे दिसून येत आहे.

भारतीय जनता पक्षाने इतिहासात प्रथमच रोहतक महानगरपालिका काँग्रेसकडून हिसकावली आहे. या महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत या पक्षाने मोठे यश मिळवले असून महानगरपालिकेत पूर्ण बहुमतही मिळविले आहे. रोहतक हा काँग्रेस नेते भूमिंदरसिंग हु•ा यांचा बालेकिल्ला मानला जातो.

Advertisement

पहिल्यांदाच पक्षीय चिन्हांवर निवडणूक

यावेळी पहिल्यांदाच सर्व राजकीय पक्षांनी स्थानिक निवडणुका स्वत:च्या नावावर आणि चिन्हावर लढविल्या होत्या. त्यामुळे कोणता पक्ष किती प्रभावी आहे, याची नेमकी माहिती या निवडणुकांमधून मिळणार होती. सर्व पक्षांनी जोरदार प्रयत्न केले होते. तथापि, भारतीय जनता पक्ष सोडून अन्य कोणत्याही पक्षाला टिकाव लागला नसल्याचे दिसून येत आहे. काही स्थानी अपक्षांची चांगली कामगिरी केली आहे.

भाजपने जिंकल्या 9 महानगरपालिका

भारतीय जनता पक्षाने अंबाला, गुरुग्राम, सोनिपत, रोहटक, कर्नाळ, फरीदाबाद, पानिपत, हिस्सार आणि यमुनानगर अशा 9 महानगरपालिका जिंकल्या आहेत. तर अन्य एका महानगरपालिकेच्या महापौरपदी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसला किंवा अन्य पक्षांना एकाही महापौरपद जिंकता आलेले नाही.

मुख्य विजयी उमेदवार

अंबालाच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या शैलजा सचदेवा यांनी काँग्रेसच्या अमिषा चावला यांचा 20 हजार 487 मतांनी पराभव केला. गुरुग्रामचे महापौरपद याच पक्षाच्या राज रानी यांनी जिंकले. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा 1 लाख 79 हजार 485 मतांनी पराभव केला. रोहतकचे आपले प्रभावक्षेत्र काँग्रेसने गमावले. येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम अवतार यांनी काँग्रेसला पराभूत केले. सोनिपतचे महापौर याच पक्षाच्या कोमल दिवान आणि कर्नाळचे महापौरपद याच पक्षाच्या रेणू बाला गुप्ता यांनी काँग्रेसचा पराभव करुन कमावले.

राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया

या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला असला, तरी काँग्रेसवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. हरियाणाच्या शहर भागात नेहमीच भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हु•ा यांनी व्यक्त केली आहे. तर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नायबसिंग सैनी यांनी या दणदणीत विजयासाठी जनतेचे आभार मानले आहेत. आपल्या पक्षाने आणि सरकारने जनतेसाठी केलेल्या स्पृहणीय कामगिरीची ही पावती आहे. या विजयामुळे आम्हाला जनतेसाठी आणखी काम करण्याचा उत्साह मिळालेला आहे, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानेही या विजयासाठी स्थानिक नेतृत्वाचे अभिनंदन केले आहे.

Advertisement
Tags :

.