महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भाजप उद्या करणार शक्तिप्रदर्शन

12:29 PM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पल्लवी, श्रीपादभाऊ दाखल करणार अर्ज

Advertisement

मडगाव : भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे या उद्या मंगळवार दि. 16 रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याच दिवशी उत्तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे अर्ज दाखल करणार आहेत. या दिवशी भाजप मडगाव व पणजी अशा दोन्ही ठिकाणी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दक्षिण गोव्यातील सुमारे 4 हजार कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार असून त्याची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. भाजपचे दक्षिण गोव्यातील कार्यकर्ते सकाळी 10 वा. दक्षिण गोव्यातील भाजपच्या कार्यालयात एकत्र होतील. त्यानंतर सर्वजण चालत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जातील आणि धेंपे या उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे सर्व मंत्री व आमदार तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भाजप सरकारमधील घटक पक्ष असलेल्या मगो पक्षाचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस पक्षाचे उमेदवार कधी अर्ज दाखल करणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article