For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ताळगावात उद्या भाजपाचा मेळावा

12:53 PM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
ताळगावात उद्या भाजपाचा मेळावा
Advertisement

आज पणजी, म्हापसा, मडगाव कार्यालयात बैठक

Advertisement

पणजी : भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे आज शुक्रवार दि. 30 जानेवारी रोजी गोव्यात येत असून आज आणि उद्या शनिवार दि. 31 जानेवारी असे दोन दिवस त्यांचे गोव्यात विविध ठिकाणी पक्षाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा भव्य मेळावा हा मुख्य कार्यक्रम उद्या शनिवारी सकाळी 10 वा. ताळगांव कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष दामू नाईक यांनी वरील माहिती देऊन सांगितले की, नबीन यांचे गोव्यात आगमन होत असल्याने पक्षात, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात उत्साह असून ते आज प्रथम पणजी येथील भाजप कार्यालयात येणार आहेत.

तेथे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून नबीन त्यात सहभागी होतील. त्यानंतर त्यांची भाजपचे आमदार तसेच मित्रपक्षाचे आमदार यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली आहे. नबीन यांच्या गोव्यातील एकंदरित कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तरुण च्युग हे गोव्यात पोहोचले असून नबीन हे म्हापसा, मडगांव येथे जाऊन दोन्ही भाजप जिल्हा समितीच्या बैठकीस हजेरी लावतील. शनिवारी ताळगांवच्या मेळाव्यानंतर नबीन हे मिरामार, पणजी येथील भाऊसाहेब बांदोडकर व मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आपल्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.