For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : कोरेगाव वगळता सातारा जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार : मंत्री शिवेंद्रराजे भोसले

05:19 PM Jan 21, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   कोरेगाव वगळता सातारा जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार   मंत्री शिवेंद्रराजे भोसले
Advertisement

                       भाजपचे उमेदवार सातारा तालुक्यातील पंचायत समितीत अर्ज दाखल

Advertisement

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघ वगळता भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सातारा तालुक्यातील भाजपच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते पंचायत समिती कार्यालयात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वरिष्ठांच्या निर्णयानुसार आमदार महेश शिंदे आणि भाजप असे युती करुन लढू, इतर ठिकाणी भाजप स्वबळावर लढेल.. उमेदवारी न मिळाल्याने काहीजण नाराज आहेत.

Advertisement

परंतु त्यांनी बंडखोरी करू नये त्यांना इतर ठिकाणी नक्की संधी दिली जाईल. त्याचबरोबर उदयनराजे भोसले हे नाराज नाहीत ते मला तसे काही बोललेही नाहीत. त्यांचे देखील काही उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढत आहेत. अशी माहिती भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

Advertisement
Tags :

.