For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

BJP Kolhapur: ताकदवान उमेदवारास पक्षात घेण्याची भाजपची रणनीती आहे तरी काय?

01:08 PM Jul 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
bjp kolhapur  ताकदवान उमेदवारास पक्षात घेण्याची भाजपची रणनीती आहे तरी काय
Advertisement

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला 10 पैकी 10 जागांवर यश मिळाले

Advertisement

By : धीरज बरगे

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर वॉच ठेवला आहे. शहरातील प्रभागनिहाय झालेल्या मतदानाचा अभ्यास केला आहे. ज्या-त्या प्रभागातील महायुतीला झालेले मतदान अन् तेथील ताकदवान उमेदवारास पक्षात घेण्याची रणनीती भाजपची आहे.

Advertisement

निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र पक्षात फुगीर भरती न करता केवळ महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाचा प्रवेश देणार आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला 10 पैकी 10 जागांवर यश मिळाले.

त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात 25 माजी नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. शिंदे शिवसेनेला माजी नगरसेवकांनी दाखवलेली पसंती जिल्ह्यात चर्चेची ठरली. मात्र यामधील बहुतांश माजी नगरसेवक भाजप आणि ताराराणी आघाडीशी संबंधित होते.

त्यापाठोपाठ मंगळवारी भाजपनेही तीन माजी नगरसेवकांसह 55 प्रमुख कार्यकर्त्यांचा मुंबईत पक्षप्रवेश करुन घेतला. यावरुन महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेत पक्षप्रवेशावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. विधानसभेनुसार महापालिकेला मतदार होणार? कोल्हापूर महापालिका हद्दीतील एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार बहुतांश प्रभाग कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात येतात तर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 28 प्रभाग येतात.

कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे राजेश क्षीरसागर तर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे संदर्भ वेगळे होते. त्याच पद्धतीने महापालिकेलाही मतदान होईल, याची शाश्वती देता येणार नाही. महापालिकेला प्रभागातील स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन मतदान होते.

त्यामुळे विधानसभेनुसार महापालिकेलाही मतदार होणार का? असाही प्रश्न आहे. शिंदे शिवसेनेत 15 तर भाजपमध्ये 5 जण वेटींगवरमाजी नगरसेवकांच्या शिवसेना, भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरुच आहेत. दोन्ही पक्षातील प्रमुख माजी नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या अटी, शर्तीवर विचार सुरु आहे.

पुढील काळात शिवसेनेत 15 राष्ट्रवादी अजित पवार गटात शांततामहायुतीमध्ये शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटही घटक पक्ष आहे. सध्या शिवसेना-भाजपमध्ये माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरुन रस्सीखेच सुरु आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात शांतता आहे.

राष्ट्रवादीसोबत सध्या 15 माजी नगरसेवक आहेत. या 15 जागांवर त्यांचे लक्ष आहे. मात्र राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणेंना फोडण्यात भाजपला यश आले. तर शिंदे शिवसेनेने भाजपचे माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेतले. यावरुन महायुतीमधील घटक पक्षातच एकमेकांचे नगरसेवक पळवले जात आहेत.

शिवसेना-भाजपमध्येच रस्सीखेचशिवसेना-भाजपमध्ये माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात पक्षप्रवेशावरुन शिवसेना शिंदे गट चर्चेत आला. माजी नगरसेवकांसह सुमारे 40 जणांचा मुंबईत पक्षप्रवेश झाला. त्यानंतर भाजपनेही मुंबईतच 55 जणांचा पक्षप्रवेश करत ‘हम किसीसे कम नही’ हे दाखवून दिले. माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्येच रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे.

Advertisement
Tags :

.