For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोपाळ कांडा यांना भाजपचे समर्थन

06:30 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोपाळ कांडा यांना भाजपचे समर्थन
Advertisement

पक्षाच्या उमेदवाराने अर्ज घेतला मागे

Advertisement

वृत्तसंस्था/ सिरसा

हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजपने सोमवारी मोठे पाऊल उचलले आहे. सिरसा मतदारसंघातील भाजप उमेदवार रोहताश जांगडा यांनी स्वत:चा अर्ज मागे घेतला आहे. भाजपने आता हरियाणा लोकहित पक्षाचे प्रमुख गोपाळ कांडा यांना समर्थन जाहीर केले आहे. कांडा हे सिरसाचे विद्यमान आमदार आहेत. यापूर्वी कांडा यांनी भाजप सरकारला स्वत:चा पाठिंबा दिला होता.

Advertisement

मी स्वत:चा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हा निर्णय राज्य आणि देशाच्या हिताकरता घेण्यात आला आहे. आम्हाला काँग्रेसमुक्त हरियाणा सुनिश्चित करायचा आहे. गोपाळ कांडा यांनी 5 वर्षांपर्यंत भाजपला समर्थन दिले आहे. आम्ही सिरसाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला असल्याचा दावा जांगडा यांनी केला आहे.

भाजपने गोपाळ कांडा यांना या निर्णयाद्वारे संदेश दिला आहे. पक्षाने सिरसा मतदारसंघातील गोपाळ कांडा यांच्याविरोधातील उमेदवार मागे घेतला आहे. कांडा यांना आता हरियाणा लोकहित पक्षाचे रानिया मतदारसंघातील उमेदवार धवल कांडा यांची उमेदवारी मागे घ्यावी लागणार असल्याचे समजते.

काँग्रेसप्रमाणेच आता भाजप देखील राज्यातील 90 पैकी 89 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविणार आहे. काँग्रेसने भिवानी मतदारसंघ माकपसाठी सोडला आहे. इंडियन नॅशनल लोकदलाने देखील सिरसा मतदारसंघात गोपाळ कांडा यांना समर्थन जाहीर केले आहे. हरियाणात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. सत्तारुढ भाजप राज्यात विजयाची हॅट्ट्रिक करू पाहत आहे. तर काँग्रेसकडून भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.