भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठौड यांना धमकी
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठौड यांना दिल्लीतील निवास्थानी फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात इसमाने राठौड यांना शिविगाळ करत गोळी मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मदन राठौड हे राजस्थानमधील भाजपचे मातब्बर नेते आहेत.
अनोळखी क्रमांकावरून 5 वेळा फोन आला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठौड यांनी हा कॉल घेतल्यावर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी मदन राठौड यांनी स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. संबंधित सुरक्षा यंत्रणांना देखील यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. भाजप खासदार मदन राठौड यांनी गुरुवारीच सर्व जण एकजूट राहिले तरच देश आणि राजस्थानात शांतता राहू शकते असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरून त्यांना ही जीवे मारण्याची धमकी मिळाली असावी असे मानले जात आहे.