महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे राज्य प्रभारी जाहीर

06:22 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बिहारमध्ये विनोद तावडे तर केरळमध्ये प्रकाश जावडेकर : कर्नाटकमध्ये राधामोहन दास नियुक्त

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने 23 राज्यांच्या निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली आहे. बिहारची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली असून दुष्यंत कुमार गौतम उत्तराखंडची जबाबदारी सांभाळतील. केरळसाठी प्रकाश जावडेकर यांना लोकसभा निवडणुकीचे प्रभारी, तर कर्नाटकसाठी राधामोहन दास अग्रवाल यांची प्रभारी आणि सुधाकर रेड्डी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशची जबाबदारी बैजयंत पांडा यांच्याकडे देण्यात आली आहे. महेंद्र सिंह मध्य प्रदेशातील निवडणूक प्रभारीपदाची धुरा हाताळतील.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप प्रत्यक्ष कृतीत उतरला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला पक्षाने सुऊवात केली आहे. शनिवारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली. त्यात बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणूक प्रभारी आणि सह-निवडणूक प्रभारींची नावे आहेत. बैजयंत पांडा यांच्याकडे देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारचे माजी आरोग्य मंत्री मंगल पांडे यांच्याकडे पश्चिम बंगालची जबाबदारी सोपवली आहे. ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपचे कमळ फुलवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि आशा लाक्रा यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेंद्र सिंह यांची मध्य प्रदेशचे लोकसभा निवडणूक प्रभारी आणि सतीश उपाध्याय यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हरियाणासाठी विप्लव कुमार देव यांची प्रभारी आणि सुरेंद्र नागर यांची सहप्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडचे प्रभारी बनवण्यात आले आहे. विजयपाल सिंह तोमर यांची ओडिशाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आमदार लता उसेंडी या सहप्रभारी असतील. बिहारमध्ये विनोद तावडे यांच्या मदतीसाठी दीपक प्रकाश यांना सहप्रभारी करण्यात आले आहे. पंजाबमध्ये विजय भाई ऊपाणी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नरेंद्र सिंह सहप्रभारी असतील. तामिळनाडूसाठी अरविंद मेनन यांची प्रभारी आणि सुधाकर रेड्डी यांची सहप्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article