For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पश्चिम बंगालातील निवडणुकीवर भाजपकडून 287 कोटींचा खर्च

06:34 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
पश्चिम बंगालातील निवडणुकीवर भाजपकडून 287 कोटींचा खर्च
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तपशिलानुसार, भाजपने पश्चिम बंगालमधील एप्रिल, 2026 च्या निवडणुकांदरम्यान आपल्या प्रचार आणि उमेदवारांवर 287 कोटी रु. खर्च केले. हा आकडा या वर्षाच्या सुऊवातीला झालेल्या पाच विधानसभा निवडणुकांमधील त्यांच्या 529 कोटी रु. च्या एकूण खर्चाच्या तुलनेत 54 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Advertisement

बंगालव्यतिरिक्त केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुचेरी येथेही निवडणुका झाल्या होत्या. बंगालमध्ये भाजपने 293 पैकी 207 जागा जिंकून सत्ताधारी टीएमसीवर मात केली, तर तृणमूलला 80 जागांवर समाधान मानावे लागले. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या अहवालानुसार, बंगालमधील सर्व 293 जागांवर निवडणूक लढवलेल्या काँग्रेसने 42 कोटी रु. खर्च केले. त्यांनी बंगालमध्ये अवघ्या दोन जागा जिंकल्या. सीपीएमने केवळ एक जागा जिंकली आणि बंगालमध्ये 8 कोटी ऊ. खर्च केले. टीएमसीने अद्याप आपला अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केलेला नाही.

निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या अहवालानुसार, बंगालमधील सर्व 293 जागांवर निवडणूक लढवण्राया काँग्रेसने 42 कोटी ऊपये खर्च केले. त्यांनी बंगालमध्ये दोन जागा जिंकल्या. सीपीएमने केवळ एक जागा जिंकली आणि बंगालमध्ये 8 कोटी ऊपये खर्च केले. टीएमसीने अद्याप आपला अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केलेला नाही.

Advertisement

केरळममध्ये 63 जागा जिंकलेल्या काँग्रेसने 105 कोटी ऊ. खर्च केले आणि केवळ 26 जागांवर समाधान मानावे लागलेल्या सीपीएमच्या नेतृत्वाखालील आघाडीला पराभूत केले. येथे जोरदार प्रचार आणि 83 कोटी ऊ. खर्च करूनही भाजपला तीन जागा जिंकता आल्या. सीपीएमने केरळममध्ये 29 कोटी ऊ. खर्च केले.

काँग्रेसने पाचही निवडणुकांमध्ये मिळून 249 कोटी ऊ. खर्च केल्याचे कळवले आहे, तर सीपीएमचा एकत्रित खर्च 39 कोटी ऊ. राहिलेला आहे. भाजपने बंगाल आणि केरळमधील खर्चाव्यतिरिक्त आसाममध्ये 96 कोटी ऊ., तामिळनाडूमध्ये 52 कोटी रु. आणि पुदुचेरीमध्ये 12 कोटी ऊ. खर्च केल्याचे कळवले आहे.

Advertisement

.