महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा

04:09 PM Jul 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते ठराव

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सरचिटणीस, सर्व मंडल अध्यक्ष तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आज दिनांक ९ जुलै रोजी सावंतवाडी भाजप कार्यालयात सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या बैठकीत सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपला मिळावा,हा ठराव सर्वानूमते मंजूर करण्यात आला. यावेळी या बैठकीस सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांच्या समवेत जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक तथा जिल्हा निमंत्रित सदस्य मनोज नाईक, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा जिल्हा चिटणीस एकनाथ नाडकर्णी,आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगावकर, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे , बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, दोडामार्ग मंडल अध्यक्ष सुधीर दळवी, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पप्पू परब, आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# bjp # sawantwadi # rajan teli
Next Article