भाजपचे पुन्हा धक्कातंत्र! मोहन यादव यांची मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर आज शिक्कामोर्तब झाले. भाजपने एक धक्कादायक निर्णय घेतना बऱ्याच दिवसांची गोपनीयता संपवली असून उज्जैनचे तीन वेळा आमदार राहिलेले 58 वर्षीय मोहन यादव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. यादव यांच्या या निवडीने भाजपच्या केंद्रीय नेर्तृत्वाने पुन्हा एकदा आपले धक्कातंत्र अवलंबले आहे.
शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्या मोहन यादव यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पहिली पसंती देण्यात आली आहे. मोहन यादव मुख्यमंत्री य़ांना मुख्यमंत्री करताना जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला अशा दोन नेत्यांनाही उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. केंद्र सरकारमध्ये मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपद सांभाळणारे माजी मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मध्यप्रदेश विधीमंडळाचे सभापती असतील.
आज भोपाळमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकी मध्य़े मोहन यादव यांचे नाव जाहीर करण्यात आले. या बैठकितील व्हायरल झालेल्य़ा व्हिडिओमध्ये मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान पुष्पगुच्छ देऊन मोहन यादव यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर मोहन यादव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मी पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे. मी तुम्हा सर्वांचे, राज्य नेतृत्वाचे आणि केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानतो. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याने मी माझी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करेन." असा विश्वास व्यक्त केला.
2013 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून 2018 च्या निवडणुकीमध्येही विधानसभेवर गेले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 2 जुलै 2020 रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
नुकत्याच झालेल्या 2023 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत, मोहन यादव यांनी आपल्या उज्जैन दक्षिण मतदारसंघात विजय संपादन करताना काँग्रेस उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांच्या विरोधात 12, 941 मतांच्या फरकाने विजय मिळवला आणि हॅट्रिक साधली.