For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपने हरियाणाचा बालेकिल्ला राखला

06:27 AM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपने हरियाणाचा बालेकिल्ला राखला
Advertisement

बिगरजाट मते, अंतर्गत कलहामुळे काँग्रेसचा पराभव

Advertisement

हरियाणा निवडणुकीत पुन्हा यश मिळवून भाजप राज्यात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. भाजपने राज्यातील 48 जागांवर यश मिळवत स्वबळावर बहुमताचा आकडा ओलांडला आहे. तर राज्यात काँग्रेसला केवळ 37 जागांवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात झालेल्या भाजप विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढतीत विरोधी पक्ष पिछाडीवर राहिला आहे.

काँग्रेसला का बसला झटका?

Advertisement

अंतर्गत कलह : पक्षातील अंतर्गत कलह आणि राज्याच्या आघाडीच्या नेत्यांदरम्यान तणाव काँग्रेसच्या पराभवाचे कारण ठररला आहे. निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रिपदावरून भूपेंद्र हु•ा आणि खासदार कुमारी शैलजा यांच्यात चढाओढ दिसून आली. प्रचारापासून तिकीटवाटपापर्यंत मतभेद ठळकपणे उघडकीस आले होते. काँग्रेस नेतृत्वाकडून प्रयत्न होऊनही पक्षाला एकजूट चेहरा सादर करता आला नव्हता.

प्रादेशिक पक्ष, अपक्ष : मतांच्या हिस्सेदारी काँग्रेस आणि भाजपमध्ये फार मोठे अंतर नसल्याचे दिसून आले आहे. परंतु अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी मते मिळविल्याने भाजपविरोधी मतांमध्ये विभागणी झाली. प्रादेशिक पक्षांना विशेष कामगिरी करता आली नाही. परंतु त्यांना मिळालेली मते पाहता काँग्रेसला फटका बसला. आम आदमी पक्षाला राज्यात 1 टक्क्यांच्या आसपास मते मिळाली आहेत. आपसोबत आघाडीचा निर्णय काँग्रेसने घेतला असता तर कदाचित वेगळे चित्रही दिसून आले असते.

बिगरजाट मतदार : भूपेंद्र हु•ा यांच्या नेतृत्वात काँग्रेसने केवळ जाट मतांवरच खास लक्ष केंद्रीत केले होते. यामुळे बिगरजाट मतदार हे भाजपच्या बाजूने एकजूट झाले आहेत. जाट मतदारांसोबत दलित मतदार सहसा जात नसल्याने ते भाजपच्या बाजूने वळले. तर ओबीसी मतदार पूर्णपणे भाजपच्या पाठिशी उभा राहिला.

भाजपचा सायलेंट प्रचार : प्रत्यक्ष तळागाळात भाजपने केलेले पक्षासाठी लाभदायक ठरले आहे. सत्ताऊढ पक्षाने यावेळी थेट मोठ्या प्रचारसभांऐवजी तळागाळात जात लोकांपर्यंत पोहोचण्याची मोहीम हाती घेतली होती. पक्षाने यावेळी केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांना प्रचाराची धुरा सोपविली होती.

शहरी मतदार : मागील एक दशकात भाजपने हरियाणाच्या शहरी भागांमधून समर्थन प्राप्त करण्यात यश मिळविले आहे. यात गुरुग्राम आणि फरिदाबाद यासारखे भाग सामील आहेत. तर गुरुग्राम, फरीदाबाद, वल्लभगड येथे भाजपने अत्यंत मोठे यश मिळविले आहे.

Advertisement
Tags :

.