महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इंधन दरवाढ विरोधात भाजपचे आंदोलन

11:10 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चन्नम्मा चौकात घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध : दरवाढ त्वरित मागे घेऊन दिलासा देण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव वाढविल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहरामध्ये आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी करत चन्नम्मा चौकात आंदोलन करून काँग्रेस सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या नावे निषेध नोंदविण्यात आला. राज्य सरकारने पेट्रोल 3 रुपये व डिझेल 3 रुपये 50 पैसे वाढविल्याने भाजपने सरकार विरोधात आंदोलन करून भाववाढ मागे घेण्यासाठी मागणी करण्यात आली. न्यायालयीन रोडवर वाहने चालवत बैलांना हाकत आंदोलन करण्यात आले. चन्नम्मा चौकात सरकार विरोधात घोषणाबाजी करत दुचाकी वाहने खांद्यावर घेऊन सरकार विरोधात बोंब ठोकण्यात आली. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. राज्य सरकारकडून गॅरंटी योजनांसाठी वारेमाप पैसा खर्च केला जात आहे. यामुळे महागाई वाढत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला.

Advertisement

यातच इंधनाचे भाव वाढविण्यात आल्याने गोरगरीब जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. काँग्रेस सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत आहे. राज्य सरकारने इंधनाचे दर त्वरित कमी करावेत, अशी मागणी करण्यात आली. आर्थिक संकटात असणाऱ्या जनतेला पुन्हा आर्थिक संकटात सरकारकडून लोटले जात आहे. यासाठी राज्य सरकारने त्वरित दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. दुष्काळामुळे संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. बी-बियाणांचे व रासायनिक खतांचे भावही कमी करण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत बैलांना दुचाकी बांधून ओढण्यात आले.अशाप्रकारे सरकारच्या इंधन दरवाढ निर्णयाचा निषेध केला. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अनिल बेनके, महांतेश कवटगीमठ, संजय पाटील, महादेवाप्पा यादवाड, अॅड. एम. बी. जिरली, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article