महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपाध्यक्ष नड्डानी घेतला राज्य प्रभारींकडून आढावा

06:45 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजप मुख्यालयात बैठक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी विविध राज्यांचे प्रभारी आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक प्रचार आणि जनसंपर्क कार्यक्रमाचा आढावा घेतला. तसेच काही जागांवरील संभाव्य उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाल्याचे समजते. एकंदर एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यताही दिसून येत आहे.

भाजप लवकरच आपल्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेण्याच्या शक्मयतेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आढावा बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असताना पक्षाच्या नेतृत्वाने समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि बूथ स्तरावर मतदारांशी संपर्क साधण्यासाठी मोहीम राबवण्यावर भर दिला.

राज्य प्रभारींसमवेत झालेल्या बैठकीनंतर भाजपाध्यक्ष  नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या उत्तर प्रदेश युनिटच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक घेतली. देशातील सर्वात मोठ्या राज्यात भाजप आपल्या जागा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. 2019 मध्ये सपा आणि बसपा यांनी हातमिळवणी करताना ज्या जागा गमावल्या होत्या त्या जागांना त्यांनी लक्ष्य केले आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपने 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article