कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिहार निवडणुकीनंतर भाजपाध्यक्ष निवड शक्य

06:17 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजनाथ सिंह यांच्याकडून स्पष्ट संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपच्या आगामी राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत महत्त्वाची माहिती शनिवारी उघड केली. बिहार विधानसभा निवडणुका संपल्यानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल असे त्यांनी सांगितले. पक्षात कोणताही अंतर्गत कलह नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एका मुलाखतीत त्यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेबद्दल भाष्य करताना संघ पक्षाच्या राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर देशभक्तीची शिकवण देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बिहार निवडणुकीदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय जनता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत एक महत्त्वाचे विधान केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते राजनाथ सिंह यांनी बिहारमध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा विश्वासही व्यक्त केला. जनभावनेच्या आधारे बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करेल आणि कदाचित दोन तृतीयांश बहुमतही मिळवेल, असे ते म्हणाले. एनडीएच्या विजयानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री होतील, असेही ते पुढे म्हणाले. सध्या बिहारमध्ये सुरू असलेली निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. बिहारमधील निवडणुका दोन टप्प्यात होत असून पहिला टप्पा 6 नोव्हेंबर रोजी पार पडला. आता 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.

प्रशांत किशोर प्रभावहीन ठरणार

राजनाथ सिंह यांनी निवडणूक रणनीतीकार-राजकारणी प्रशांत किशोर आणि त्यांच्या जनसूराज पक्षाबद्दलही आपले मत व्यक्त केले. प्रशांत किशोर हे विशेष महत्त्वाचे नाहीत आणि त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही. कोण मते विभागण्यासाठी लढत आहे आणि कोण सरकार स्थापन करण्यासाठी लढत आहे याची पूर्ण जाणीव जनतेला आहे. साहजिकच प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असली तरी त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता येणार नाही, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article