For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्रासाठी भाजप निरीक्षक नियुक्त

06:57 AM Dec 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्रासाठी भाजप निरीक्षक नियुक्त
Advertisement

निर्मला सीतारामन, विजय रुपानी यांच्यावर उत्तरादायित्व, उद्या होणार पक्षनेत्याची निवड

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापनेसाठी सज्जता करण्यात येत असून भारतीय जनता पक्षाने विधीमंडळ पक्षनेता निवडण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची निरीक्षण म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक मुंबईत उद्या, अर्थात 4 डिसेंबरला होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेते निवडला जाणार आहे. हाच नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतो. नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे.

Advertisement

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची मतगणना 23 नोव्हेंबरला झाली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काही छोटे पक्ष यांच्या महायुतीला 288 पैकी 236 जागांचे प्रचंड बहुमत मिळाले  आहे. तथापि, मतगणना होऊन 10 दिवस झाल्यानंतरही अद्याप सरकार स्थापना झालेली नाही। सरकारस्थापनेचा दिवस घोषित करण्यात आला असून 5 डिसेंबरला सरकारची स्थापना करण्यात येणार आहे, हे निश्चित मानले जात आहे.

निरीक्षकांची नियुक्ती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही नेते अनुभवी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विधीमंडळ नेत्याची निवड पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांकडूनच करण्यात येणार असून हे दोन नेते या निवड प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत. या बैठकीत नेता सर्वानुमते निर्धारित केला जाईल, असा विश्वास महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

विलंब का...

मोठे बहुमत असूनही सरकार स्थापनेला इतका विलंब का लागत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, मतगणना झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी विलंब लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतरही सरकार स्थापनेसाठी विलंब लागलाच होता. काहीकाळ राष्ट्रपती राजवटही लागू करावी लागली होती. तसेच 1999 च्या विधानसभा निवडणुकीनंरही सरकार स्थापनेला एक महिन्याचा विलंब लागला होता. युतीची किंवा आघाडीची सरकारे स्थापन करताना असा विलंब लागणे नैसर्गिक आणि अपेक्षित असते, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. कारण दोन-तीन पक्षांची सरकारे स्थापन करताना सत्तेचे वाटप हा प्रमुख मुद्दा असतो. ही बाब महत्वाची ठरते.

शपथविधीसाठी सज्जता...

महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असून त्यासाठी सज्जता करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा आणि अनेक मान्यवर केंद्रीय नेते उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या 22 राज्यसरकारांचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

मंत्र्यांसाठी कठोर पात्रता निकष

महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात नव्या आणि तरुण प्रतिनिधींनाही स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच सर्व मंत्र्यांची पात्रता आणि क्षमता विचारात घेतली जाणार आहे. मंत्र्यांची पात्रता सुनिश्चित करण्यासाठी कठोर निकष लावण्यात येण्यात आहेत. मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे निधारित करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजीत पवार हे तीन प्रमुख नेते आज मंगळवारी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. तेथे मंत्र्यांच्या सूचीला अंतिम रुप दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार स्थापना येत्या गुरुवारी होणार आहे, हे निश्चित असल्याचे संकेत देण्यात येत आहेत.

सरकार स्थापनेची उत्कंठा

ड 5 डिसेंबरला सरकार स्थापना केली जाणार हे निश्िचत असल्याची माहिती

ड भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक आज मंगळवारी मुंबईत येण्याची शक्यता

ड नव्या सरकारमधील मंत्र्यांची निवड करण्यासाठी कठोर निकष लावले जाणार

Advertisement
Tags :

.