For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज-उद्या गोवा भेटीवर

08:45 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज उद्या गोवा भेटीवर
Advertisement

पणजी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे आज मंगळवार दि. २७ व उद्या बुधवार दि. २८ असे दोन दिवस गोवा भेटीवर येत असून आज गोवा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत.

Advertisement

भाजपच्या कदंब पठार येथील अटल भवन या नवीन कार्यालयात सदर बैठक आखण्यात आली असून ती पूर्ण दिवस चालणार आहे. त्यात नबीन हे मार्गदर्शन करणार असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कानमंत्र देणार आहेत. उद्या बुधवारी नबीन हे मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांना भेटणार असून एकंदरीत निवडणूक रणनीती तयारीचा आढावा घेणार आहेत.

गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष दामू नाईक यांनी अटल भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती देऊन सांगितले की, या बैठकीत निवडणूक तयारीवर भर देण्यात येणार असून राजकीय तसेच सामाजिक ठरावही संमत केले जाणार आहेत. भाजपचे विविध मोर्चा-विभाग आणि त्यांचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी नबीन चर्चा करणार असून एकंदरीत सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सक्रिय करण्यासाठी ते संवाद साधणार आहेत.

Advertisement

नबीन हे राज्य कार्यकारिणी बैठकीत पूर्ण दिवस सहभागी होऊन विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकण्यासाठी तयारी करण्यावर भर देणार आहेत. गोव्यातील सर्व ४० मतदारसंघांचा ते आढावा घेणार असून भाजपची कितपत तयारी झाली आहे, याची माहिती घेणार आहेत. भाजपच्या प्रभारी डॉ. भारती पवार, सहप्रभारी अनिल अँटोनी, संघटन मंत्री शिवप्रकाश हेदेखील गोव्यात असून ते बैठकीत भाग घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.