महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भाजप खासदाराचे ‘जय हिंदूराष्ट्र’

06:55 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभेत शपथविधी प्रसंगी विविध खासदारांच्या घोषणांमुळे गदारोळ

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

लोकसभेत खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर विविध खासदारांनी काही घोषणा दिल्यामुळे मोठाच गदारोळ उडाला आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार छत्रपाल गंगवार यांनी ‘जय हिंदूराष्ट्र’ अशी घोषणा दिली. गंगवार हे उत्तर प्रदेशच्या बरेली मतदारसंघातून निवडून आले आहेत. याच पक्षाचे गाझियाबाद येथील खासदार अतुल गर्ग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयजयकाराची घोषणा खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर दिली. खासदार गंगवार यांच्या घोषणेला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ही घोषणा घटनाविरोधी असल्याचा आरोप केला. घटनेची शपथ घेऊन पेलेली ही कृती घटनाबाह्या आहे, असेही प्रतिपादन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केले.

ओवैसींच्या घोषणेने वाद

एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी जय पॅलेस्टाईन अशी घोषणा देत त्या देशाच्या नावाने शपथ घेतली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे खासदार संतप्त झाले. आंध्र प्रदेशचे खासदार जी. केशन रे•ाr यांनी ओवैसी यांच्यावर जोरदार टीका केली. भारतात राहून हे लोक भारत माता की जय असे म्हणत नाहीत. तर पॅलेस्टाईनचा जयजयकार करतात. ही कृती घटनाबाह्या असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘जय हिंदूराष्ट्र’ या घोषणेला विरोध करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांनी ‘जय पॅलेस्टाईन’ या घोषणेला मात्र, विरोध केल्याचे दिसून आले नाही. ‘आम्ही कोणत्या देशाला विरोध करत नाही. तथापि, दुसऱ्या एका देशाच्या नावाने भारताच्या लोकसभेत शपथ घेणे सर्वथैव अयोग्य आहे,’ अशी खोचक टिप्पणी सांसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांनी केली. 2019 मध्ये ओवैसी यांनी ‘जय भीम, अल्ला हो अकबर, जय हिंद’ अशी घोषणा दिली होती.

‘जय श्रीराम’ अशीही घोषणा

भारतीय जनता पक्षाच्या अनेक खासदारांनी शपथ ग्रहण करताना ‘जय श्रीराम’ अशी घोषणा दिली. त्यामुळे लोकसभेत श्रीरामाच्या जयजयकाराचा नारा घुमला. विविध खासदारांनी त्यांच्या त्यांच्या विचारसरणीनुसार विविध घोषणा दिल्याने ते या वेळच्या शपथविधी कार्यक्रमाचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्या ठरले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article